2015-11-04-06-34-26गोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या...
7870
history-of-saptakotishwarThe Saptakotishwar Temple is one of the oldest and a very ancient temple in Goa. It is mentioned in ancient scriptures and the recorded history of the...
12970
2015-11-04-06-25-58फिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक...
8730
2015-11-04-06-21-41सप्‍तकोटीश्‍वर शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे....
6930
2012-02-13-06-36-35 फार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे  वास्तव्य करून होते. त्याकाळातील...
24680

Login Form

कुलदैवत

map

फार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे  वास्तव्य करून होते. त्याकाळातील लोकांनी जी दैवते मानली त्यांनाच आम्ही कुलदैवते असे मानतो व ही कुलपरंपरा आहे. ह्या कुलपरंपरेनुसार फार पूर्वीपासूनच पिढ्यानपिढ्या ह्या दैवतांना भजत आलो व श्रद्धेने ही देवस्थाने  त्या कुटुंबाकडे आजही आहेत. ‘श्रद्धा’ ही देवाला देवपण आणते. ईश्‍वराला त्याची भक्ती भक्ताकडून हवी असते व ह्या भक्तीतून श्रद्धा निर्माण होते. राजा असो किंवा रंक असो! श्रीमंत असो किंवा गरीब! सर्वांनाच सर्वश्रेष्ठ असा हा भगवंत मानावा लागतो व त्याची प्रचीतीही आल्याशिवाय रहात नाही. ह्या कुटुंब दैवताची परंपरेनुसार आमचे कुलदैवत म्हणून श्री सप्तकोतीश्वर हे नार्वे, गोवा येथे कुलदैवत आहे. हे कुलदैवत पूर्वकाळात गोव्यातील दीपवती आजचे दीवाडी बेटावर होते. 

सुमारे चारशे वर्षांपूर्वी पोर्तुगीज लोक ह्या दिवाडी जवळच गोमंतक भूमीत आले व सुरूवातीलाच त्यांनी धर्मांतर मोहीम सुरू केली. काहीही निमित्त करून हे धर्मांतर घडत असे व गांवचे गांव बाटले जाई !

 त्यावेळचे सनातनी व सोवळे लोक धर्मनिष्ठ असे होते. त्यात ब्राह्मण, सारस्‍वत, मराठी, कुणबी व इतर जातीचेही लोक होते. जे ह्या ज्ञातीतील लोक बाटले गेले, तें व आजही पिढ्यान् पिढ्या तेथे ख्रिश्‍चन म्‍हणून वास्तव्य करून आहेत. अशी ही वेगवेगळ्या ज्ञातीची माणसे, वेगवेगळ्या धर्मांच्या ठशाची असली तरी, शेवटी धर्म हाच माणसाला माणुसकी शिकवितो. माणसाने त्याचा स्वीकार सदबुध्धीने करायचा आहे.

त्याकाच्या धर्मांतर मोहिमेत जी कुटुंबे गोव्याचे हद्दीतून म्हणजेच गोमंतकातून बाहेर पडलीती मात्र ह्या धर्मांतरापासून बचावलीअशी अनेक कुटुंबे ह्या गोमंतकाचे दक्षिणेकडे कारवारमंगलोरउडपीकर्नाटक वगैरे ठिकाणी व उत्तरेकडे कारवारमंगलोरवेंगुर्लेमालवणत्नागिरीराजापूरमुंबई व अन्य इतरत्र अशा ठिकाणी जावून तेथे त्या पूर्वजांनी वास्तव्यही केलेआजही अशी अनेक कुटुंबे ह्या सागर किनारी कोकणांत आहेतपरंतु त्यांची बहुतेक लोकांची कुलदैवते मात्र आजही गोव्यातच अस्तित्वात आहेत.

अशी ही कुटुंबे पिढ्यान् पिढ्या ह्या गोमंतकात जावून आपले कुलदैवताची सेवा श्रद्धेने करीत असतात व दर्शनासही जात असतातह्या श्रद्धेतूनच पुण्यकर्म घडत असते व ह्या पुण्याईचा साठा प्रत्‍येक कुटुंबात संचीत होत असतोएका पिढीची पुण्याई साधारण दोन पिढ्या चालतेपुढील पिढीनेही त्यात ईश्वर सेवेचे  पुण्यकर्म करून भरपाई करणे आवश्यक आहेअनेक कुटुंबे ही फक्त एकत्र व विभक्त अशी रहात असतात व ह्या पुण्याईनुसारच कुटुंबात भावनात्मक एकात्मका घडत असतेभावनाप्रेम हे माणसाला पैशानी विकत मिळत नाहीतत्यासाठी भावनेचीच जोड असणे भाग आहे व दयाक्षमाशांती ह्यालाच आपण कुटुंबातील लक्ष्‍मी म्हणतोह्या लक्ष्‍मीचे वास्तव्य कुटुंबातील वातावरणात रहाणेच कठीण आहेएक पिढी दुस-या पिढीस तात्वीक भाग दाखवून देतेवेळकाळयुग हे बदलत रहातेसाधने सामुग्रीही बदलतातपरंतु तात्वीक भाग हा कधीच बदलत नसतोह्यासाठीच हे देवत्वकोठेतरी आपले दैवत्वाकडे लक्ष केंद्रित करणे भाग आहेबाकी वस्तूरूपी बदल माणसाचे जीवनात नेहमीच घडत असतातहे देवतत्वाचे लक्ष केंद्रित करण्‍यासाठीच ही दैवते आहेत व कुलदैवत त्यापैकीच एक आहे. 

असे हे आमचे कुलदैवत श्री सप्तकोटीश्वर हे पूर्वकाळात दिपवती म्‍हणजे आजचे दिवडी बेटावर होतेनंतरचे काळात ते जिर्णोद्धारासाठी नार्वे येथे घाडले गेलेह्या दिवाडी बेटातील रहिवासी म्‍हणजे काही दिवाडकर ह्या बेटावर होतेपरंतु पूर्वकाळातील काही माणसें ह्या धर्मांतराचे मोहिमेचे भयाने इतरत्र वास्तव्य करण्यास तेथून निघाली व ठिकठिकाणी गेलीआमचे दिवाडकर कुटुंब त्याकाळात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर ह्या आजच्या तालुक्यात नरवण ह्या गावी आलेतेथे काही दिवाडकर मंडळींची घरे आजही अस्तित्वात आहेतपिढ्यान् पिढ्या मागील चारशे वर्षांचे काळात तेथेच वास्तव्य करून आहेत.

 आमचे पूर्वज जर ह्या धर्मांतर मोहिमेत गोमंतकातून बाहेर पडले नसते तर, ह्या काही दिवाडकर कुटुंबांचे डिसोझा, डिसील्‍व्हा ह्या नांवाचे ख्रिश्‍चन धर्माचे कुटुंब पुढचे पिढीचे  गोव्यातच दिसले असते. परंतु असे धर्माबदल ह्या कुटुंबाचे संपर्काला आले नाही. माणसे ही तीच रहातात परंतु संस्कृती व संस्काराचा शिक्का मात्र ह्या धर्मठश्याचा त्या माणसावर असतो. शेवटी प्रत्येक धर्मात माणुसकीच धर्माने सांगितली आहे व ती अंतीम पाळावी लागते

shilalekha

अशाच आजच्या गुहागर तालुक्‍यातील नरवण ह्या गावी असलेल्या शंभर वर्षापूर्वीचे सदाशिवराव चिमणाजी यांचे कुटुंबात याची प्रचीती आली. सदाशिवराव यांचे ज्येष्ठ चिरंजीव जगन्नाथराव हे मुंबईकडे चुलते नारायणराव यांचे आश्रयाने शैक्षणिक कारणासाठी नरवणहून मुंबईकडे आले. शैक्षणिक कार्य संपलेवर त्यांनी कामधंदा स्वीकारला व ते मुंबईचे त्यावेळचे सुप्रसिद्ध इंग्रजी विल्सन हायस्कूल मध्ये कलाशिक्षक म्‍हणून नोकरीस राहिले. ह्या कलेचे निमित्ताने सुमारे पाऊणशे वर्षे पूर्वी त्यांचा इंग्रज अधिकार-यांशी संबंध आला. त्याकाळात त्यांनी दिलेला रेल्‍वेवरील केटरींग धंदा स्वीकारला व नंतर नोकरीपेशा सोडला. कर्जतजवळ रायगड जिल्ह्यात जमीनजुमलाही त्या सुमारास निर्माण केला. कोकणातील आपलेच कुटुंबातील पुणे, कर्जत, ल्याणचे बंधू, प्त, नातलग व गांवचे मित्रमंडळींनाही त्यांनी पूर्वीच मुंबईकडे आणले व ह्या धंद्यात व स्थावर जंगममध्ये सहकारास घेतले. कुटुंबात असा एखादाच पुण्यवान निघतो कि ज्यामुळे अखिल कुटुंब उज्वल भवितव्य साधू शकते. आज ह्या पुण्याईमुळे आर्थिक सुबत्ता ह्या कुटुंबास लाभली.

नदीचा उगम हा कोठेतरी पुण्यभूमितून होत असतो व नंतर ह्या नदीचे पात्र अथांग असे सर्वत्र पसरले जाते. गंगाजळी वहात असते व पुढील पिढीस नंतरही ह्या गंगाजळीचा लाभ मिळत जातो. नदीचे पात्र हे जरी पुढे कितीही अथांग पसरले व खोलवर गेले तरी, उगमाचे पावित्र्य हे कोणालाच विसरता येत नाही. तसेच हे आहे.

देवतत्वांचे तात्विक दृष्टीने, जेथे स्वार्थ म्‍हणून नसतो, तेथेच परमार्थ घडतो. तसा हा परमार्थ कै. जगन्नाथराव यांचेकडून घडला गेला. ह्यालाच पुण्याई म्‍हणतात. ह्या पुण्याईला अनुसरून पुढील पिढीनेही ह्या पुण्यकर्मास हातभार लावला व पुण्याव्यावहारिक दृष्टीने सांभाळली. स्तुरूपी साठा हो नेहमीच होतो. परंतु पुण्यकर्म मात्र नेहमीच घडत नाही. माणसाचे जीवनात सत्कर्म व कुकर्म हे नेहमीच घडत असते. परंतु तात्विक भाग जाणून सत्कर्म करणे हा एक देवतत्वाचा भाग आहे. दैवताकडे कोणीच पाहिले नाही, तर काय घडणार आहे? पुण्या व दैवते ही नष्ट पावणारी आहेत. क्त आहे, म्‍हणूनच देव आहे, व जेथे भक्त असतो तेथेच ईश्वराचे स्थान रहाते. माणसाचे विचार, बुद्धी व मनापलिकडे जी शक्ती आहे ह्यालाच आपण  ईश्व म्हणतो. अगर सर्वच माणसाचे मनासारखे घडले असते. मनुष्याने जरी आयोजन केले तरी, त्यासाठी ईश्वराची कृपा असावी लागते. तरच तें घडते. अगर नाही. शेवटी अहंकार जावून ईश्वराला मानावे, भजावे व शरण जावे तेव्‍हांच कार्यसिद्धी घडत असते.

अगर ईश्वर ह्या अहंकारास आपली प्रचीती एक दिवस दाखवून देतो. पुण्यकर्म हे नेहमीच मानावे लागते. कै. जगन्नाथराव यांचे पुण्यकर्मामुळेंच आज त्यांचे कुटुंबाचे आर्थिक उज्वल भवितव्य साधले गेले. हे सर्व वस्तुरूपी आहे. पुण्यकर्माचे साठीच श्वक्ती सर्वांनीच करणे, हे क्रमप्राप्त आहे. हे भक्तीमार्ग मात्र वेगवेगळ्या त-हेने घडत असतात. कुलदैवत हे ह्या भक्तीचे एक स्थान आहे. मनुष्य निर्वाणाचे वेळी वस्तुरूपी असे काहीच घेवून जात नाही. बरोबर जातात ती पाप-पुण्याची गाठोडी! हा एक निसर्ग नियम आहे.

जय जय श्री सप्तकोटीश्वर !

 

- मधूकर जगन्नाथ दिवाडकर

कै. जगन्नाथराव स. दिवाडकर यांचे स्मरणार्थ

राधा निवास, पळसदरी, ता. कर्जत

दिनांकः २१..१९९०