2015-11-04-06-34-26गोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या...
7730
history-of-saptakotishwarThe Saptakotishwar Temple is one of the oldest and a very ancient temple in Goa. It is mentioned in ancient scriptures and the recorded history of the...
12570
2015-11-04-06-25-58फिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक...
8590
2015-11-04-06-21-41सप्‍तकोटीश्‍वर शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे....
6740
2012-02-13-06-36-35 फार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे  वास्तव्य करून होते. त्याकाळातील...
24380

Login Form

एका सुंदर स्‍वप्‍नाचा अकस्‍मात अस्‍त

गोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या नद्या, लगतच्‍या सह्याद्रीवरून कोसळणारे धबधबे आणि अशा या नंदनवनाहुनही सुंदर असलेल्‍या गोमांतकावर राज्‍य करणारे कदंबराजे हे सुसंस्‍कृत, कलाप्रिय आणि तेवढेच शूर होते. थोडेसे का होईना पण त्‍यांचे आरमारही होते.   

 या कदंब घराण्‍याची जी राजदैवते होती त्‍यात दिवाडी येथे सप्‍तकोटीश्वर शंकराचेही मंदिर भव्‍य आणि अतिसुंदर होते. कदंब राजे स्‍वतःला ‘गोपकपट्टणाधिपति सप्‍तकोटीश्वर लब्‍ध वरप्रसाद’ अशी पदवी अत्‍यंत अभिमानाने मिरवीत असत. पुढे कदंबांची राजवट यादवांनी बुडविली आणि नंतर यादवांची राजवट सुलतानांनी बुडविली. आधि विजापूरच्‍या आदिलशाहाच्‍या ताब्‍यात गोवा गेला. त्‍यांच्‍याकडून वास्‍को--गामा या पोर्तुगीज दर्यावर्दी सरदाराने दिनांक १५ फेब्रुवारी १५१० या दिवशी गोवा जिंकून घेतले. तेव्‍हापासून पोर्तुगीज सत्ता ही गोव्‍यात मूळ धरून बसली. या पोर्तुगीजांना धर्मवेड लागलेलं होतं. स्‍वधर्माचा म्‍हणजेच ख्रिश्चॅनिटीचा प्रचार करण्‍याचा त्‍यांना क्रर छंद जडला होता. सत्ता स्थिरावल्‍यावर त्‍यांनी इ.. १५६५ या वर्षी योजनापूर्वक गोमांतकातील साडेसहाशे मंदिरे फोडली. असंख्‍य लोक सक्‍तीने बाटविले. अनेकांनी आपापल्‍या देवमूर्ती मोठ्या धाडसाने लपतछपत पळविल्‍या आणि सध्‍याच्‍या फोंडेमहालात ठिकठिकाणी त्‍या स्‍थापिल्‍या. ज्‍येस्‍युईट ख्रिश्चन मिशनर-यांनी हिंदूंचा भयंकर धर्मछळ मांडला. यावर डॉ. . के. प्रिओळकर यांचा अभ्‍यासपूर्ण असा ग्रंथ आहे. गोवा इन्‍क्‍वीझिशन. या छळवादाला गोमांतकीय लोक थरथरा कापीत असत. हा छळवाद जेथे चाले त्‍याला म्‍हणत व्‍होडलेघर. म्‍हणजे यमाचे घर.

Read more: एका सुंदर स्‍वप्‍नाचा अकस्‍मात अस्‍त

History of Saptakotishwar

The Saptakotishwar Temple is one of the oldest and a very ancient temple in Goa. It is mentioned in ancient scriptures and the recorded history of the temple is very interesting and fascinating. This temple is considered to be one of the six great sites of temples of Lord Shiva in the Konkan area.

Situated in Narve, the complex is spread across . . . . . acres of lush green surroundings. The village of Narve is located about 35 Kms. From Panaji and can be reached via an interesting route which requires a ferryboat from the island of Divar. The presiding deity in the temple is an incarnation or manifestation of the Supreme Load Shiva and as is the practice, is represented in the form of a Linga. The Linga itself is a faceted one where the face of the Lord is shown in human form and is a distinctive ‘Dharalinga’ type or ‘Mukhlingam’ (mukh – face) and is made of polished stone. The Lings is . . . . . feet by . . . . . feet by . . . . . feet high and is made from an alloy of 7 metals.

Read more: History of Saptakotishwar

कुलदैवत

map

फार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे  वास्तव्य करून होते. त्याकाळातील लोकांनी जी दैवते मानली त्यांनाच आम्ही कुलदैवते असे मानतो व ही कुलपरंपरा आहे. ह्या कुलपरंपरेनुसार फार पूर्वीपासूनच पिढ्यानपिढ्या ह्या दैवतांना भजत आलो व श्रद्धेने ही देवस्थाने  त्या कुटुंबाकडे आजही आहेत. ‘श्रद्धा’ ही देवाला देवपण आणते. ईश्‍वराला त्याची भक्ती भक्ताकडून हवी असते व ह्या भक्तीतून श्रद्धा निर्माण होते. राजा असो किंवा रंक असो! श्रीमंत असो किंवा गरीब! सर्वांनाच सर्वश्रेष्ठ असा हा भगवंत मानावा लागतो व त्याची प्रचीतीही आल्याशिवाय रहात नाही. ह्या कुटुंब दैवताची परंपरेनुसार आमचे कुलदैवत म्हणून श्री सप्तकोतीश्वर हे नार्वे, गोवा येथे कुलदैवत आहे. हे कुलदैवत पूर्वकाळात गोव्यातील दीपवती आजचे दीवाडी बेटावर होते. 

सुमारे चारशे वर्षांपूर्वी पोर्तुगीज लोक ह्या दिवाडी जवळच गोमंतक भूमीत आले व सुरूवातीलाच त्यांनी धर्मांतर मोहीम सुरू केली. काहीही निमित्त करून हे धर्मांतर घडत असे व गांवचे गांव बाटले जाई !

Read more: कुलदैवत

फिरंगाण अन् शिवाजीराजे

फिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे

येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक वास्‍तूंवर सखोल संशोधन करून इतिहासाचा मागोवा घेणारे इतिहासतज्‍ज्ञ सदाशिव टेटवीकर यांनी गोमंतक फिरंगाण आणि शिवाजी महाराज यावर केलेले बोलके भाष्‍य.

मायमराठीची अस्मिता, परकीय आक्रमणांविरुद्ध आक्रमकता, हिंदुस्‍थानचा राष्‍ट्राभिमान . . . याची तेजस्‍वी शिकवण सुमारे तीनशे वर्षांपूर्वी शिवाजीराजांनी दिली होती. गोमंतकाच्‍या इतिहासातही छत्रपतींनी फिरंग्‍यांविरोधात जो विचार मांडला तो आजही प्रेरणा देतो.

शिवाजी महाराजांच्‍या जन्‍मापूर्वी शंभर-सव्‍वाशे वर्षे आधी तत्‍कालीन अत्‍याधुनिक शस्‍त्रसज्‍ज जहाजे घेऊन हजारो मैलांचा प्रवास करून आलेल्‍या वास्‍को-डी-गामा नंतर आलेल्‍या अल्‍बुकर्क याने सागर व खाडीकिना-यावरील प्रदेश जिंकून घेऊन गोमंतक येथे पोर्तुगीज राजवटीचा पाया घातला. पुढील शंभर वर्षांत जेवढ म्‍हणून इथला भूभाग ताब्‍यात आला तेवढ्या प्रदेशातील एतद्देशियांची मंदिरे, प्रार्थनास्‍थळांचा नाश करून त्‍या जागेवर पोर्तुगीजांनी चर्च उभी केली व साम, दाम, दंडाचा उपयोग करून सर्वत्र ख्रिस्‍तीकरण केले. या ख्रिस्‍तीकरण केलेल्‍या भागाला फिरंगाण म्‍हणण्‍याची प्रथा मराठेशाहीत रूढ झाली. या फिरंगाणामुळे गोमंतक किंवा गोव्‍याचे तेव्‍हा दोन भाग पडले होते. समुद्रकिना-यापासून दूर जंगलातील डोंगराळ भागात किंवा सह्याद्रीच्‍या कुशीतील डिचोली, सत्तरी, मणेरी, फोंडा या भागात हिंदू तर किना-यावरील भागात पोर्तुगीज व बाटगे ख्रिश्‍चन म्‍हणजे फिरंगी राहत होते.

Read more: फिरंगाण अन् शिवाजीराजे

आरती

shiva

 आरती श्रीसप्तकोटीश्वराची 

चाल जयजय दीनदयाल सत्यनारायण देवा

 

जयहर शिवहर जगत्पालका पार्वतिपरमेशा

 पंचारति ओवाळुं महेशा नुरवीं भवपाशा⃓⃓धृ. ⃓

 सात कोटी ऋषीश्वरांनी तपाचरण केले

 म्हणुनी दर्शन दुर्मिळ तुझें मानवांस घडलें

 दर्शन होतां प्रेमे भजतां, नेसी अघ नाशा

सप्तधातुंची मूर्ति विलसे तव गर्भागारी

 भवसिंधूतुनि पामर भक्तां तुंची प्रभु तारी

शरणागत मी मज उद्धरशिल हिच आशा

 सप्तकुलाचल सप्तसमुद्रां सप्तहि पाताले

 सप्तदिपा वसुंधरेला देवा तूं रचिले

कृपाकटाक्षे तुझिया दुखे पावतील नाशा

 सप्तर्षींच्या अनन्य भक्तिस भाळलास प्रेमें

 प्रसिद्ध दर्शन तव हें सप्तकोटीश्र्वर नामे

सह्यगिरीच्या कुशीं नारवे उणें कैलासा

शंभू शिवहर पिनाकपाणी इति तव अभिधाने

ज्योतिर्लिंगे द्वादश जागृत तव पूजास्थाने

 

सप्‍तकोटीश्‍वर

सप्‍तकोटीश्‍वर

शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे. ‘श्रीसप्‍तकोटीश्‍वर लब्‍धवर प्रसाद’ अशी बिरुदावली मिरविणा-या गोव्‍यातील हे जागृत शिवतीर्थस्‍थान आहे.

 सह्यपर्वतात उगम पावलेल्‍या पंचगंगा नदीच्‍या काठी वशिष्‍ठ ऋषींनी तपश्‍चर्या केली. यावेळी त्‍यांच्‍या मुखातून सप्‍तकोटी मंत्राचा उच्‍चार झाला. त्‍यामुळे शिवशंभू प्रसन्न झाले म्‍हणून या शिवलिंगास सप्‍तकोटीश्‍वर असे नाव प्राप्‍त झाले, तर काहींच्‍या मते जुन्‍या गोव्‍यासमोर दीपवती बेटाच्‍या उत्तर भागात सप्‍तऋषींनी शिवशंकराची सात कोटी वर्षे उग्र तपश्‍चर्या केली. शिवजी प्रसन्न झाले आणि सप्‍तकोटीश्‍वर या नावाने त्‍यांनी वास्‍तव्‍य केले. कोकण महात्‍म्‍यात सप्‍तकोटीश्‍वराचे वर्णन, ‘द्विपवाड क्षेत्र महाथोर, जेथ देव सप्‍तकोटीश्‍वर, नारवे रहिवास मंदिर, स्‍थान सप्‍तऋषींचे॥ सप्‍तधातूंचे लिंग म्‍हणती, तेथे नवरत्‍नांची ज्‍योती। ऐशी नवल प्रभा स्थिती॥’ असे केलेले आहे. सोने, रुपे, तांबे, लोखंड, कथिल, शिसे आणि कासे या सप्‍तधातूंनी हे शिवलिंग बनविलेले आहे. सप्‍तकोटीश्‍वर हे कदंब राजघराण्‍याचे कुलदैवत आहे.

Read more: सप्‍तकोटीश्‍वर

Devasthan

16

In the early days of known history, Shrisaptakotishwar Temple was situated at Divadi Island near old Goa. Due to frequent invasions on Konkan region by Bahamani Sultans in 14th Century (between 1352-1366), many Hindu temples in Goa got destroyed. Shri Saptakotishwar Temple was also destroyed and the Shiva Linga was thrown away in a paddy field. Subsequently King of Vijayanagar defeated Muslim invaders and reinstalled the Shiva Linga (1391).
Shri Saptakotishwar Temple at Divadi Island was destroyed again by the Portuguese (1540).  The Shiva Linga from the temple was kept near a well. The church building was built on the old temple site.

Read more: Devasthan