2015-11-04-06-34-26गोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या...
4200
history-of-saptakotishwarThe Saptakotishwar Temple is one of the oldest and a very ancient temple in Goa. It is mentioned in ancient scriptures and the recorded history of the...
4440
2015-11-04-06-25-58फिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक...
4680
2015-11-04-06-21-41सप्‍तकोटीश्‍वर शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे....
3390
2012-02-13-06-36-35 फार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे  वास्तव्य करून होते. त्याकाळातील...
19940

Login Form

Appeal

bhakta niwas2

श्री सप्तकोटीश्वर प्रसन्न⃓

 

श्री सप्तकोटीश्वराच्या सर्व महाजनांना व भक्तांना विनम्र आवाहनः

आपले श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तकोटीश्वराचे चरणी लवकरच नवीन भक्तनिवासाच्या बांधकामास आरंभ होणार आहे. नवीन भक्तनिवासासाठी 1कोटी 10लाख एवढा खर्च नियोजित असून नजीकच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांना रीतसर निमंत्रण पाठविण्यात येईल. या कार्यक्रमासाठी आपण हजर रहाल अशी आशा व्यक्त करतो. नवीन भक्तनिवासाचे काम शीघ्रगतीने व्हावे व श्री  सप्तकोटीश्वराच्या महाजनांची व भक्तांची चांगल्या प्रकारे सोय व्हावी असा देवस्‍थान कमिटीचा प्रामाणिक प्रयत्‍न राहील.

हे सर्व निर्धारित वेळेत पूर्ण होण्‍यास निधीची अत्‍यंत गरज आहे. श्री सप्‍तकोटीश्‍वर देवस्थान कमिटी सर्व महाजनांना व भक्तगणांना या पत्रकाद्वारे विनम्र आवाहन करते की, नियोजित नवीन भक्तनिवासाच्या बांधकामास लागणा-या निधीस आपण सढळ हस्ते मदत करावी.

आपण आमच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देवून जो निधी पाठविणार आहात त्यासाठी देवस्थान कमिटीने सारस्वत को. ऑप. बँक लि., शाखा डिचोली, गोवा येथे वेगळे खाते (अकाउंट) सुरू केले आहे. सदर खाते क्रमांक 338200100000173असून या खातेक्रमांकावर सारस्वत बँकेच्या कोणत्याही शाखेतून तसेच आपल्या शहरातील इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून IFSC Code: SRC B00000338 श्री सप्तकोटीश्वर देवस्थान नार्वे डिचोली, गोवा येथे आपला निधी पाठवू शकता अथवा पोस्टाद्वारे चेक पाठवू शकता. तसेच निधी पाठविल्यानंतर आपला पूर्ण पत्ता व फोन नंबर पत्राद्वारे पाठवून द्यावा, म्‍हणजे देवस्थान कमिटीला आपल्याला आपण पाठविलेल्या निधीची पोहोचपावती पाठविणे सोईचे होईल.

कृपया चेक अथवा डी.डी. SAPTAKOTISHWAR DEVASTHAN COMMITTEEया नावे काढावा.

धन्यवाद

आपले विश्वासू,

 

श्री सप्तकोटीश्वर देवस्थान कमिटी

देऊळवाडा, नार्वे (डिचोली), गोवा.

E-mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

Web-site: www.shrisaptakotishwar.com